सिंहगडच्या पायथ्याला भरले पक्ष्यांचे संमेलन |Sinhagad | Bird Valley | Pune

2021-03-02 3

(संतोष खुटवड - सकाळ वृत्तसेवा )
पुणे - इंद्रधनुष्यीय सौंदर्य... चित्तवेधक किलबिलाटाचा नादमधूर झंकार... आकाशी झेपावणारी इवल्याशा पंखांची सुखद फडफड... असे आल्हाददायी मंत्रमुग्ध करणारे वातावरण किल्ले सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या आतकरवाडीजवळील (ता. हवेली) बर्ड व्हॅलीत मनप्रसन्न करून टाकते. येथे सूर्योदय व सूर्यास्तावेळी सुंदरतेचे वरदान लाभलेले डौलदार बूलबूल व चिमणीवर्गीय पक्ष्यांचे संमेलन भरले आहे. पुणे तसेच राज्यभरातील पक्षी अभ्यासक, पर्यटक अन॒ पक्षीप्रेमींसाठी ते पर्वणी ठरत आहे. (सर्व छायाचित्रे : दत्तात्रेय लांघी)